top of page

फेसबुकवरील 'बेम्भाटे मास्तरांची शाळा' या समूहाच्या २६ कवींचा संपादित काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहाचे संपादक नवनाथ पवार, स्वाती धर्माधिकारी आणि दगडू लोटे हे असून प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची प्रस्तावना या काव्यसंग्रहाला लाभली आहे. विशेष म्हणजे या काव्यसंग्रहातील कवितांकरिता याच समूहातील चित्रकारांनी सुंदर आणि अतिशय समर्पक अशी चित्रे रेखाटलेली आहेत. हे पुस्तक रेणुका प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दि १८ ऑगस्ट २०१२ रोजी प्रा. रंगनाथ तिवारी आणि प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या उपस्थितीत अंबाजोगाई येथे पार पडले. या काव्यसंग्रहात माझ्या पुढील पाच कवितांचा समावेश आहे.



• जागर
• तिचा जन्म
• परीक्षा
• बळीराजाची व्यथा
• हास्य

ऋतू शब्दांचे

सूर माझ्यामनीचे

फेसबुकवरील 'माझ्यामना' या समूहाच्या ४० कवींचा संपादित काव्यसंग्रह.
माझ्यामना प्रकाशन हे ई-पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे. या काव्यसंग्रहाच्या संपादक सौ. अनघा हिरे या आहेत. हे पुस्तक माझ्यामना प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दि २९ डिसेंबर २०१२ रोजी मुंबई येथे पार पडले. या काव्यसंग्रहात माझ्या पुढील पाच कवितांचा समावेश आहे.


• कधी कधी 
• घे जरा विसावा 
• तुझी आठवण येते रे देवा 
• शिक्षक 
• नेता की अभिनेता 

लोकांस आता जागवा पुन्हा
विझल्या मशाली पेटवा पुन्हा

वर्षाव हा सुखांचा ना भावतो मला 
दुःखांतही अता मी रमतो कधी कधी  

- जागर (ऋतू शब्दांचे)

- कधी कधी (सूर माझ्यामनीचे)

bottom of page